गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना निर्बंध शिथिल करा, गणेशोत्सव मंडळ कृती समितीची मागणी

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना निर्बंध शिथिल करा, गणेशोत्सव मंडळ कृती समितीची मागणी

| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 10:08 AM

कोकणातील सर्वांना आता गणेशोत्सवाचे वेध लागलेत. कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी गणेशोत्सवाची मज्जा लुटता येणार का याची काळजी लागलीय. त्यामुळे आता येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांना सवलत मिळावी म्हणुन आता कोकणातले आमदार एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. कोकणातील आमदार गणेशोत्सवाच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. 

कोकणातील सर्वांना आता गणेशोत्सवाचे वेध लागलेत. कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी गणेशोत्सवाची मज्जा लुटता येणार का याची काळजी लागलीय. त्यामुळे आता येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांना सवलत मिळावी म्हणुन आता कोकणातले आमदार एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. कोकणातील आमदार गणेशोत्सवाच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. गणेशोत्सवाच्या सणाच्या पाश्वभूमीवर ही भेट घेतली जाणार आहे.  गणेशेत्सवासाठी चाकरमान्यांवर निर्बंध शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे अर्ज केला जाणार आहे. त्यासाठीच ही भेट असणार आहे. मुंबई लोकल प्रमाणे दोन डोस घेतलेल्या चाकरमान्यांना प्रवासाची विनाअट मुभा द्यावी अशीही मागणी केली जाणार आहे. दोन डोस घेतलेल्यांना कोकण रेल्वेतून सुद्धा प्रवासाची अट देण्यात यावी अशी मागणी केली जाणार आहे.