Raigad : रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी? धक्कादायक माहिती आली समोर
Raigad News : भारतीय तटरक्षक दलाने रायगड जिल्ह्यातील कोर्लई किनाऱ्याजवळ किनाऱ्याजवळ २.५ ते ३ नॉटिकल मैल अंतरावर पाकिस्तानी बोट दिसल्याची माहिती.
भारतीय तटरक्षक दलाने रायगड जिल्ह्यातील कोर्लई किनाऱ्याजवळ २.५ ते ३ नॉटिकल मैल अंतरावर एक संशयास्पद पाकिस्तानी बोट दिसल्याची माहिती 6 जुलैला समोर आली होती. आता कोर्लई समुद्रकिनाऱ्याजवळ पाकिस्तानी मासेमारी बोटीचा जीपीएस प्रणाली असलेला बोया सापडल्याने खळबळ उडाली आहे. पाच महिन्यांपूर्वी हा बोया मासेमारी बोटीपासून वेगळा झाला होता आणि 6 जुलै रोजी तटरक्षक दलाला तो आढळला होता. मात्र, त्यानंतर तो बेपत्ता झाला. सुरक्षा यंत्रणांनी विशेष शोधमोहीम राबवल्यानंतर अखेर हा बोया सापडला. विशेष म्हणजे, या बोयाचे सिग्नल पाकिस्तानमधून ट्रॅक होत असल्याचे उघड झाले आहे, ही बाब धक्कादायक आहे.
कोर्लईजवळ रडारवर आढळलेली वस्तू बोट नसून, पाकिस्तानी मासेमारी बोटीवरील जीपीएसयुक्त बोया असल्याचे तपासात स्पष्ट झाले. या घटनेने कोकण किनारपट्टीवरील सागरी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
