Pune : हातात कोयता अन् 4-5 जणं आले… कोयता गँगला पुणे पोलीस कधी आवरणार? विमाननगरमध्ये घडलं काय?

| Updated on: Nov 29, 2025 | 10:44 AM

पुण्याच्या विमाननगर परिसरात कोयत्या गँगने मोठी दहशत माजवली आहे. एका पान टपरीवर कोयता गँगने हल्ला केला. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने पान टपरीवर येत सुरूवातीला काही वस्तू मागितल्या. फुकट वस्तू मिळवण्याच्या उद्देशाने कोयत्या गँगचं हे कृत्य असल्याचे व्हिडीओत दिसून येतंय.

पुण्यात कोयता गँगनं चांगलाच धुडगूस घातल्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसताय. सिगारेट फुकट न दिल्याच्या रगातून कोयता गँगनं पुण्यातील विमाननगर परिसरातील पान टपरी चालकावर हल्ला करत त्याच्या पान टपरीती तोडफोड केली. तर गेल्या काही दिवसांपूर्वी एका बारमध्ये कोयता गँगने चांगलीच लूटमार केल्याचा प्रकार पाहायला मिळाला होता. विमाननगरमध्ये कोयता गँगने एका पान टपरी व्यवसायिकावर हल्ला केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  हा हल्ला फुकट वस्तू मिळवण्याच्या उद्देशाने करण्यात आला होता. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दुकानावर येऊन वस्तू मागितल्या; दुकानदार देत असतानाच एका आरोपीने कोयता काढून दुकान फोडायला सुरुवात केली. या टोळक्यात काही आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पोलीस खात्याकडे केली आहे.

Published on: Nov 29, 2025 10:44 AM