Kranti Redkar | सत्याच्या लढाईला पुरावा गरजेचा- क्रांती रेडकर
सत्याच्या लढ्यासाठी कायदेशीर पुरावा असणे अत्यंत गरजेचे आहे, जो आज आपल्याला मिळाला आहे. आज आम्हाला सरकारकडून असा आदेश मिळाला आहे.
मुंबई : समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर त्यांची पत्नी आणि चित्रपट अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. क्रांती रेडकर म्हणाल्या की, सत्याच्या लढ्यासाठी कायदेशीर पुरावा असणे अत्यंत गरजेचे आहे, जो आज आपल्याला मिळाला आहे. आज आम्हाला सरकारकडून असा आदेश मिळाला आहे. आमच्यावर लावलेले सर्व खोटे आरोप खोटे ठरवणारा आणि आम्हाला सक्षम करणारा कागद मिळाला आहे. काही जण पोलिस म्हणून आमच्या घरी येत होते तर काही जण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये येऊन आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही सर्वांसमोर येऊ दिल्या नाहीत. आमच्यासाठी ती मोठी लढाई होती, असे क्रांती रेडकर यांनी म्हटले आहे.
Published on: Aug 14, 2022 01:27 AM
