Sayaji Shinde : ही चेष्टा आहे का? एक झाड तोडलं तर आम्ही 100 लोकं… कुंभमेळ्यासाठी 1800 झाडं तोडणार! सयाजी शिंदे भडकले अन्…
नाशिक शहरातील तपोवन परिसरात कुंभमेळ्यासाठी १८०० झाडे तोडण्याच्या नियोजित निर्णयाविरोधात अभिनेते सयाजी शिंदे यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. "एक झाड तोडल्यास आम्ही १०० लोक मरायला तयार आहोत," असे आक्रमक उद्गार त्यांनी काढले आहेत.
नाशिक शहरातील तपोवन परिसरात कुंभमेळ्यासाठी सुमारे १८०० झाडे तोडण्याच्या नियोजित निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला असून, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. “एक झाड तोडल्यास आम्ही १०० लोक मरायला तयार आहोत,” असे शिंदे यांनी म्हटले आहे, त्यांच्या या विधानाने या विषयाला वेगळे वळण दिले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी यापूर्वी एक झाड तोडले तर १० झाडे लावू असे विधान केले होते. यावर सयाजी शिंदे यांनी “ही चेष्टा आहे का?” असा सवाल करत महाजन यांच्या वक्तव्यातील गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तपोवनातील जुनी आणि वारसा असलेली झाडे तोडणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांना मनोज साठे आणि मनीष बाविस्कर यांच्यासह नाशिकमधून अनेक फोन येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
