Kunal Kamra : कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी
कॉमेडीयन कुणाल कामरा याच्या याचिकेवर 16 एप्रिलला हायकोर्टात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.
कॉमेडीयन कुणाल कामरा याच्या याचिकेवर 16 एप्रिलला हायकोर्टात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. खार पोलीस ठाण्यातील एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी कुणाल कामरा याने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आजची सुनावणी आता संपली असून पुढची सुनावणी 16 एप्रिल रोजी होणार आहे.
कुणाल कामरा याने आपल्यावर 4 गुन्हे दाखल झाल्यानंतर मुंबई हायकोर्टात धाव घेतली. हे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी याचिका त्याने दाखल केलेली आहे. यावर न्यायमूर्ती कोतवाल यांच्यासमोर आज सुनावणी झाली, त्यावेळी विरोधी पक्षाच्या वकिलांनी आपल्याला अद्याप याचिकेची सगळी कागदपत्र मिळालेली नसल्याने या सुनावणीत अधिक वेळ मागितला होता. मात्र कुणाल कामराच्या वकिलाने कोर्टासमोर पुढची सुनावणी लवकरात लवकर व्हावी अशी मागणी केली, त्यानुसार 16 तारखेला ही सुनावणी ठेवली आहे.
Published on: Apr 08, 2025 01:02 PM
