Laxman Hake : लक्ष्मण हाके यांचा अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप

Laxman Hake : लक्ष्मण हाके यांचा अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप

| Updated on: Jun 04, 2025 | 5:43 PM

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्याविरोधा पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेले आहे.

निधीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके रोज नवनवीन आरोप करत आहेत. अजित पवार हे अर्थ खात्याला गोचीडसारखे चिटकलेले आहेत, असा आरोप हाके यांनी केला आहे. एससी, एसटी, ओबीसी हा निधी इतरत्र वळवला असा आरोपही हाके यांनी केला आहे. मात्र हे आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांना रुचले नाहीत. त्यामुळे आता हा वाद राजकीय औकात आणि तोडपाणी पर्यंत येऊन पोहोचला आहे.  आमदार अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांच्याबद्दल नननवीन दावे आणि खुलसे केलेले आहेत. त्यामुळे काहे आणि मिटकरी या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपओलेली बघायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणावर टीव्ही9 मराठीकडून आज लक्ष्मण हाके आणि रुपाली ठोंबरे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा केली आहे.

Published on: Jun 04, 2025 05:43 PM