Ajit Pawar : सरकारनं पालकमंत्र्यांची घोषणा करावी, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी
काँग्रेसचे सर्व निर्णय दिल्लीतून व्हायचे. भाजपचेही महत्त्वाचे निर्णय दिल्लीतून होतात. शिंदे गटाच्या आमदारांची संख्या कमी असल्यानं सहाजिकच महत्त्वाचे निर्णय दिल्लीतून होतील, असंही ते म्हणाले.
मुंबई : सरकारनं लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करावा. पालकमंत्र्यांची घोषणा करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. शिंदे सरकारचं सर्व निर्णय हे दिल्लीवरून होणार, हे स्पष्ट आहे. शिंदे सरकार असलं तरी हे भाजपचं सरकार आहे, असा टोला अजित पवार यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लगावला. मंत्रिमंडळा विस्तार केल्यास पालकमंत्री त्या-त्या जिल्ह्यात जाऊ शकतात. आढावा घेऊ शकतात. अधिवेशनाची मागणी मी दोन-चार दिवसांपूर्वी केली होती. त्यामुळं राज्यातील प्रश्न सभागृहात मांडता येतील. काँग्रेसचे सर्व निर्णय दिल्लीतून व्हायचे. भाजपचेही महत्त्वाचे निर्णय दिल्लीतून होतात. शिंदे गटाच्या आमदारांची संख्या कमी असल्यानं सहाजिकच महत्त्वाचे निर्णय दिल्लीतून होतील, असंही ते म्हणाले.
Published on: Jul 27, 2022 08:15 PM
