बागेश्वर बाबावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे नाहीतर…, अंनिसनं दिला थेट इशारा

| Updated on: Mar 18, 2023 | 11:00 PM

VIDEO | अंनिसचे संस्थापक श्याम मानव यांची बागेश्वर बाबाच्या जादूटोणाविरोधात कारवाई करण्याची मागणी, बघा काय म्हणाले...

Follow us on

मुंबई : धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या मीरा रोड येथे 2 दिवस होणाऱ्या दिव्य दर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, अंनिसचे संस्थापक श्याम मानव यांनी याबाबत भाष्य केले आहे. याबाबत श्याम मानव म्हणाले की, आम्ही दिलेल्या तक्रारीत जादूटोणाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारण नागपुरात झालेल्या त्यांच्या दिव्य दरबारात या कायद्याचे वारंवार उल्लंघन झाले आहे. डॉक्टरची पदवी नसलेल्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीवर उपचार करण्याचा दावा केला तरी ते कायद्याचे उल्लंघन आहे, आणि या दोन गोष्टींमुळे धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. कारण या महाराजांनी तुकाराम महाराजांविरुद्ध अत्यंत चुकीचे विधान केले होते, असेही त्यांनी म्हटले आहे. श्याम मानव म्हणाले की आम्ही धीरेंद्र शास्त्री यांना आव्हान केले आहे, त्यांनी सर्वकाही बरोबर सांगितले तर आमचे आव्हान स्वीकारा, त्यांच्यासाठी 30 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कारवाई न केल्यास आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा आता अंनिसकडून देण्यात आला आहे.