शिवसेनेला कुणी गृहीत धरू नये, डॉ. नीलम गोऱ्हे यांचा इशारा कुणाला?

| Updated on: Feb 04, 2023 | 10:09 AM

शिवसैनिकांची मानसिकता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना सांगणार आहे. ७ तारखेपर्यंत अर्ज भरायचा असून पक्षप्रमुख यांच्याकडून ज्या सूचना येतील त्याचे पालन करू.

Follow us on

पुणे : स्वर्गीय मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. याचा आढावा घेण्यासाठी पुण्यातील शिवसैनिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत दोन्ही जागा लढविण्याची तयारी आहे अशी मानसिकता व्यक्त करण्यात आली. विधानपरिषदेच्या निमित्ताने महाविकास आघाडीला चांगला कौल मिळाला आहे. मविआची वाटचाल चांगली सुरु आहे. शिवसैनिकांची मानसिकता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना सांगणार आहे. ७ तारखेपर्यंत अर्ज भरायचा असून पक्षप्रमुख यांच्याकडून ज्या सूचना येतील त्याचे पालन करू. पण, अनेकदा शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा सुरु असते. पुण्यात अनेकवेळा असे दिसून आले की अनेकांचे अनेक समझोते असतात. तसे होऊन जनतेचे नुकसान होऊ नये याची काळजी आम्ही घेणार आहोत. कुणी आम्हाला गृहीत धरू नये असा इशारा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिला आहे.