हातात पडेल ते घ्या; उद्धव ठाकरे यांची बजेटवरून टीका

हातात पडेल ते घ्या; उद्धव ठाकरे यांची बजेटवरून टीका

| Updated on: Mar 16, 2023 | 9:04 AM

उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पाला पंचामृत म्हटल्यावरूनही जोरदार टोलेबाजी केली आहे.

मुंबई : विधानसभेत अधिवेशन सुरू आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात अर्थसंकल्प केल्यानंतर यावर आता चर्चा सुरू आहे. याचदरम्यान उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पाला पंचामृत म्हटल्यावरूनही जोरदार टोलेबाजी केली आहे. पंचामृत म्हणजे पूजेनंतर हातावर थोडं थोडं ठेवतात तो प्रसाद. त्या प्रसादामुळे काही पोट भरत नाही. कोणालाही पोटभर देणार नाही, हातात जेवढं पडेल त्यावर पोट भरा आणि डोक्यावर हात फिरवा असेच काही या सरकारने या बजेटमधून केल्याची टीका त्यांनी केली आहे. तर पंचामृताचे काही थेंब सरकारी कर्मचाऱ्यांवर शिंपडायला काहीच हकत नव्हती, असा टोलाही त्यांनी लगावला.

Published on: Mar 16, 2023 09:04 AM