Bhandara Leopard : भंडाऱ्यातील टाकळीत बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

| Updated on: Aug 17, 2022 | 7:21 PM

परिसरात शोध घेतले असता जागाच असलेल्या दुग्ध उत्पादक संस्थेच्या पडक्या इमारतीत सुद्धा बिबट्याचे पग मार्क आढळले. असे वनक्षेत्रपाल विवेक राजूरकर यांनी सांगितलं.

Follow us on

भंडारा : शहरालगतच्या टाकळी परिसरात असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मागे बिबट असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आली. या माहितीच्या आधारे शोध घेतले असता वन अधिकार्‍यांना या परिसरात बिबट्याचे पग मार्क आढळले. हा बिबट्या 13 ती 15 महिन्यांचा असण्याची माहिती देण्यात आली आहे. भंडारा येथून वरठी मार्गावर टाकळी आहे. तेथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ बिबट्या वावरताना नागरिकांच्या लक्षात आले. याची माहिती तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. अधिकार्‍यांनी तात्काळ टाकळी येथे पोहोचून शोध घेणे सुरू केले. यात त्यांना औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या मागे पग मार्क आढळून आले. सोबतच कंपाऊंड वॉलच्या तारांवर त्याचे केससुद्धा मिळाले. सोबतच परिसरात शोध घेतले असता जागाच असलेल्या दुग्ध उत्पादक संस्थेच्या पडक्या इमारतीत सुद्धा बिबट्याचे पग मार्क आढळले. असे वनक्षेत्रपाल विवेक राजूरकर यांनी सांगितलं. या क्षेत्रात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.