लाँगमार्चमधील शेतकऱ्यांची नाशिकच्या वाडीवऱ्हे येथे विश्रांती, बघा काय आहेत व्यथा?

| Updated on: Mar 13, 2023 | 10:30 PM

VIDEO | नाशिकच्या दिंडोरी येथून सुरू झालेल्या शेतकरी, कष्टकरी, आदिवासी बांधवांचा लाँग मार्च आता नाशिकच्या वाडीवऱ्हे येथे दाखल

Follow us on

नाशिक : काल नाशिकच्या दिंडोरी येथून सुरू झालेल्या शेतकरी, कष्टकरी, आदिवासी बांधवांचा लाँग मार्च आता नाशिकच्या वाडीवऱ्हे या ठिकाणी दाखल झाला आहे. जवळपास 50 ते 55 किलोमीटरचे अंतर दोन दिवसांत पायी चालत हा लाँगमार्च वाडीवऱ्हे येथे मुक्काम करणार आहे. या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले आहे. दिवसभर पायी चालून थकल्याने आता आता हे आंदोलक वाडीवऱ्हे येथे थांबून जेवणाचा आस्वाद घेत आहे. दरम्यान, किसान सभेचं लाल वादळ उद्या मुंबईत धडकणार आहे. रस्त्यावर शेतमाल फेकून शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणांचा जाहीरपणे निषेध व्यक्त केला आहे. किसान सभेचे अजित नवले , जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला गेला असून यामध्ये आता कष्टकरी, आदिवासी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या मोर्चामध्ये शेतकरी, आदिवासी, कर्मचाऱ्यांनीही सहभाग असल्यामुळे या लाँग मार्चला आता सरकार कसं तोंड देणार ते उद्याच कळणार आहे.