Madhuri Elephant : आनंदाची बातमी, ‘माधुरी’ लवकरच नांदणी मठात येणार! कोल्हापुरात परतण्याचा मार्ग मोकळा!

Madhuri Elephant : आनंदाची बातमी, ‘माधुरी’ लवकरच नांदणी मठात येणार! कोल्हापुरात परतण्याचा मार्ग मोकळा!

| Updated on: Aug 07, 2025 | 2:03 PM

नांदणी मठातील माधुरी हत्तीणीच्या परतण्याचा मार्ग मोकळा होताना दिसतोय. गुजरातच्या वनताराने हत्तीण लवकरात लवकर कोल्हापुरात परतणार असं म्हटलंय. नेमकं काय घडलंय?

अखेर कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीच्या परतण्याचा मार्ग मोकळा होताना दिसतोय. नांदणी मठ आणि वनतराच्या सीईओमध्ये बैठक झाली. त्यानंतर माधुरी हत्तीण लवकरात लवकर परत येणार असं वनतराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वनतराच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि त्यात सुप्रीम कोर्टात सरकार सोबत पक्षकार होण्यासाठी ही ओकात दिला. तसंच नांदणी मठाच्या जवळ माधुरी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास मदत करणार असल्याचं वनतराकडून सांगण्यात आले. तर राजू शेट्टींनी माधुरी हत्तीणीवर काय उपचार करायचे असतील ते नांदणी मठातच करा असं म्हणत वनतराच्या भूमिकेला पाठिंबा दिला. दुसरीकडे वनतारान पत्र काढत नांदणी मठ आणि कोल्हापूरकरांची माफी मागत सर्व प्रकारच्या मदतीची तयारी दर्शवली.

‘माधुरी कोल्हापुरातच राहावी अशी इच्छा आणि आपुलकी व्यक्त करणाऱ्या भक्त मठाच्या नेत्यांच्या भावनांशी पूर्ण जाणीव आणि कदर करतो. माधुरीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी मठ आणि महाराष्ट्र सरकार यांनी सुप्रीम कोर्टात केलेल्या कायदेशीर अर्जास वनतारा पूर्ण पाठिंबा देईल. हा प्रस्ताव कोर्टाच्या निर्देशांचं पालन करण्यासाठी मांडण्यात आलेला आहे हे स्पष्ट करू इच्छितो. कोर्टाच्या मान्यतेनुसार वनतारा सुरक्षित परतीसाठी संपूर्ण तांत्रिक आणि पशुवैद्यकीय साहाय्य प्रदान करेल. जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे आमचे विचार, शब्द किंवा कृतीने तुम्हाला दुःखावा असल तर त्यासाठी आम्ही तुमची क्षमा मागतो.’, असं म्हणत वनताराने कोल्हापूरकरांची माफी मागितली.

Published on: Aug 07, 2025 10:34 AM