सादर करण्यात आलेल्या कागद पत्रांवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? यासह पहा इतर अपडेट महाफास्ट न्यूज 100 मध्ये

| Updated on: Oct 07, 2022 | 8:27 PM

धनुष्यबाणावर निवडणूक आयोग कायद्यानुसार निर्णय देईल असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

Follow us on

शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे कागद पत्रं आज जमा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी 180 राष्ट्रीय कार्यकारणींची यादी जोडली आहे. तर 2 ते 3 लाख प्रतिनिधींची यादी जोडण्यासाठी आणखीन मुदत वाढ मागितली आहे. याच वेळी शिंदे गटाकडूनही निवडणूक आयोगासमोर कागद पत्रं जमा करण्यात आली. शिंदे गटाच्या वकीलांनी शेवटच्या क्षणी कागद पत्रांचे 7 ते 8 गठ्ठे जमा केले. यामध्ये शिंदे गटात गेलेल्या 40 आमदार 12 खासदार आणि 1.5 लाख प्रतिनिधींची यादी जोडण्यात आली आहे. तर आयोगाकडून सादर करण्यात आलेल्या कागद पत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच सोमवारी यावर बैठक ही आयोग घेणार असल्याचे सुत्रांकडून कळत आहे. तर धनुष्यबाणावर निवडणूक आयोग कायद्यानुसार निर्णय देईल असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.