MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 16 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 9:02 AM

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांसह विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. आपल्या सगळ्यांचे एकत्रित आशीर्वाद घेण्यासाठी हा दिवस असतो. शस्त्रपूजन झाल्यानंतर मी माझ्या खऱ्या शस्त्रांची पूजा केली. आपल्यावर फुलं उधळली. ही माझी खरे शस्त्र आहेत. हे आशीर्वाद घेत असताना माझ्या मनात नेहमी नम्र भावना असते. प्रत्येक जन्मी हेच आई-वडील, माझा कुटुंब-परिवार हाच मिळायला पाहिजे आणि महाराष्ट्रात जन्म व्हायला पाहिजे. मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटू नये, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

ठाकरे कुटुंबावर हल्ले करणारा असा मायचा पूत जन्माला आलेला नाही. त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू, असं म्हणत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतलाय. पद येतील आणि जातील, सत्ता येईल आणि जाईल पण अहमपणा तुझ्या डोक्यात जाऊ देऊ नको ही शिकवण मला आजोबांनी आणि वडिलांनी दिली, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय.