MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 29 August 2021

| Updated on: Aug 29, 2021 | 7:59 AM

राणे यांचा ताफा शिवसेना कार्यालयासमोर जात होता. त्यावेळी काही शिवसैनिक हातात झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत होते. त्यावेळी राणेंनीही आपली गाडी काही वेळ तिथेच थांबवली आणि घोषणाबाजी करणाऱ्या शिवसैनिकांवर नजर रोखली!

Follow us on

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत नारायण राणेंनी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर राणेंना झालेली अटक व सुटका, या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यात सध्या नारायण राणे विरुद्ध शिवसेना असं राजकीय चित्र पाहायला मिळत आहे. अशावेळी नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा शनिवारी रात्री कुडाळमध्ये पोहोचली. राणे यांचा ताफा शिवसेना कार्यालयासमोर जात होता. त्यावेळी काही शिवसैनिक हातात झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत होते. त्यावेळी राणेंनीही आपली गाडी काही वेळ तिथेच थांबवली आणि घोषणाबाजी करणाऱ्या शिवसैनिकांवर नजर रोखली!

राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात दाखल होण्यापूर्वीत मंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांनी इशारा दिला होता. राणेंनी वैयक्तिक टीका केली तर जशास तसं उत्तर मिळेल असं वैभव नाईक म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर आज राणेंची जनआशीर्वाद यात्रा कुडाळमध्ये दाखल झाली. त्यावेळी शिवसेना कार्यालयासमोर राणेंचा ताफा पोहोचला असता उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी शिवसैनिकांच्या हातात भगवे झेंडे होते. ही घोषणाबाजी पाहून राणेंनीही आपली गाडी काही वेळ थांबवली आणि शिवसैनिकांवर नजर रोखली. त्यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत राणेंचा ताफा पुढे नेला.