MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 3 September 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 3 September 2021

| Edited By: | Updated on: Sep 03, 2021 | 8:06 AM

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडाने गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यावेळी या शिष्टमंडळाकडून राष्ट्रपती कोविंद यांना एक निवदेन देण्यात आलं. या निवेदनावर संभाजीराजे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रतिनिधीची सही आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. मराठा संघटनांनी राज्य आणि केंद्र सरकारला इशारा देत आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. तर दुसरीकडे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडाने गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यावेळी या शिष्टमंडळाकडून राष्ट्रपती कोविंद यांना एक निवदेन देण्यात आलं. या निवेदनावर संभाजीराजे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रतिनिधीची सही आहे. पण भाजपच्या प्रतिनिधींनी या निवदेनावर सही करणं टाळलं असल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात एकी नसल्याचं दिसून आलं. (All party delegation led by Sambhaji Raje Chhatrapati meets President Ramnath Kovind)

दरम्यान, राष्ट्रपतींना भेटण्यासाठी शिष्टमंडळ पोहोचलं त्यावेळी निवेदनावर भाजप खासदारीच स्वाक्षरी नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी राष्ट्रपती कोविंद यांनी याबाबत विचारला केली. राष्ट्रपतीनी चौकशी केल्यानंतर मात्र भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या निवेदनावर स्वाक्षरी केल्याची माहिती मिळतेय.

संभाजीराजे यांनी राज्यातील चारही प्रमुख पक्षांना आपले प्रतिनिधी पाठवण्याचं आवाहन केलं होतं. त्याला राजकीय पक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपले प्रतिनिधी पाठवले. त्यात शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत, भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, तर काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांचा समावेश होता. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीपूर्वी संभाजीराजे आणि शिष्टमंडळातील अन्य नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली.

Published on: Sep 03, 2021 08:06 AM