MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 5 November 2021
देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याऐवजी दिल्लीत जाऊन लोकांसाठी तोंड उघडावं. लोकांची कामं तरी होतील. पवार कुटुंब ईडी, सीबीआय अशा कारवायांना बधणार नाही. शरद पवारांविरोधात कुणीतरी ट्रकभर पुरावे घेऊन येणार होतं, त्याचं काय झालं? शरद पवार हे योद्धे आहेत आणि त्यांच्यामागे जनतेची ताकद आहे.
दिवाळीच्या तोंडावर राज्यात राजकीय फटाके उडवण्याची एकही संधी महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते सोडताना दिसत नाहीत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना नवाब मलिकांनी लवंगी फटाका फोडला आहे. दिवाळीपर्यंत थांबा, दिवाळीनंतर मी बॉम्बच फोडणार आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावलाय.
देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याऐवजी दिल्लीत जाऊन लोकांसाठी तोंड उघडावं. लोकांची कामं तरी होतील. पवार कुटुंब ईडी, सीबीआय अशा कारवायांना बधणार नाही. शरद पवारांविरोधात कुणीतरी ट्रकभर पुरावे घेऊन येणार होतं, त्याचं काय झालं? शरद पवार हे योद्धे आहेत आणि त्यांच्यामागे जनतेची ताकद आहे. पवार कुटुंबावर होत असलेल्या कारवायांकडे आम्ही लक्षही देत नाही, अशा शब्दात रोहित पवार यांनी फडणीसांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर दिलंय. त्याचबरोबर राज्यात महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करत आहे. त्यामुळे विरोधकांचा पोटशूळ उठलाय, अशी टीकाही त्यांनी केलीय.
