MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 16 October 2021

| Updated on: Oct 16, 2021 | 4:07 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात महाराष्ट्राला साद घालत जोरदार भाषण ठोकलं. उद्धव ठाकरेंच्या जवळपास 1 तास चाललेल्या भाषणात त्यांनी भाजपवर आसूड ओढले. महाविकास आघाडी सरकार, कोरोना, भाजप, ईडी सीबीआय अशा अनेक विषयांवरुन त्यांनी शाब्दिक फटकारे लगावले.

Follow us on

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात महाराष्ट्राला साद घालत जोरदार भाषण ठोकलं. उद्धव ठाकरेंच्या जवळपास 1 तास चाललेल्या भाषणात त्यांनी भाजपवर आसूड ओढले. महाविकास आघाडी सरकार, कोरोना, भाजप, ईडी सीबीआय अशा अनेक विषयांवरुन त्यांनी शाब्दिक फटकारे लगावले. अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचं जोरदार कौतुक केलं. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी 9 वाजताच पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंनी केलेल्या टीकेची सव्याज परतफेड केली. एकेकाळी शिवसेनेच्या मेळाव्यात विचारांचं सोनं लुटलं पण कालच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी गरळ ओकली, अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केली.

एकेकाळी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला विचारांचं सोनं लुटले जायचं, पण काल मुख्यमंत्र्यांना गरळ ओकताना बघितलं, अशी घणाघाती टीकेने फडणवीसांनी पत्रकार परिषदेची सुरुवात केली. भाजपला जनतेने नाकारलं नाही. आम्ही जेवढ्या जागा लढलो त्यापैकी 70 टक्के जागा जिंकलो. आम्हाला जनतेने नाकारलं नाही. तुम्ही बेईमानीने सरकार बनवलं. आताचं तयार झालेलं सरकार हे बेईमानीने बनलेलं आहे, असा घणाघाती हल्ला फडणवीसांनी केला.