MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 16 September 2021

| Updated on: Sep 16, 2021 | 3:57 PM

मुख्यमंत्र्यांचा हा औरंगाबादेतील दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. एमआयएम, मराठा समाज, धनगर समाजासह आता मनसेनंही मुख्यमंत्र्यांच्या विरोध केलाय. मनसेनं आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना दौऱ्याला विरोध करणार असल्याची घोषणा केली आहे.

Follow us on

17 सप्टेंबर अर्थात 74 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये जय्यत तयारी सुरु आहे. या दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ), पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांची उपस्थिती राहिल. उद्या सकाळी 9 वाजता सिद्धार्थ उद्यानातील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या स्मृती स्तंभाजवळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री शहरातील इतर नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहतील. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्याची मुख्य प्रशासकीय इमारत अर्थात विभागीय आयुक्तालयावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. औरंगाबादच्या दौऱ्यात मुख्यमंत्री शहरातील जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन करतील तसेच पैठण येथील संतपीठाच्या उद्घाटनाची घोषणा करतील.