MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 27 December 2021

| Updated on: Dec 27, 2021 | 4:19 PM

विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीवर अभ्यास करून निर्णय देतो असं आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलं होतं. राज्यपालांच्या या आश्वासनावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. इतका अभ्यास बरा नाही. त्यांच ओझं झेपलं पाहिजे, असा चिमटा संजय राऊत यांनी राज्यपालांना काढला आहे.

Follow us on

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. राज्यपाल आपले फार अभ्यासू आहेत. त्यांना प्रत्येक विषयाचा अभ्यास करावा लागतोय. इतका अभ्यास बरा नाही. त्या अभ्यासाचं ओझं झेपलं पाहिजे. इथे मुळात लॉकडाऊन काळात अभ्यास कमी झाला आहे. आता प्रत्येक गोष्टीत अभ्यास करायला लागलात. आपल्या संविधानात काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यानुसार काम करायचं आहे. घटनेत स्पष्ट लिहिलंय की मंत्रिमंडळाच्या शिफारशी तुम्ही मान्य करायच्या आहेत, असं राऊत म्हणाले.