Liquor Permit : राज्यात 41 मद्यनिर्मिती उद्योगांना 328 नवे परवाने, भाजप अन् दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संबंधित कंपन्यांसह निकटवर्तीय लाभार्थी!

Liquor Permit : राज्यात 41 मद्यनिर्मिती उद्योगांना 328 नवे परवाने, भाजप अन् दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संबंधित कंपन्यांसह निकटवर्तीय लाभार्थी!

| Updated on: Aug 25, 2025 | 11:11 AM

महाराष्ट्र सरकारने 41 मद्यनिर्मिती उद्योगांना 328 नवीन परवाने मंजूर केले आहेत. यात भाजपच्या पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या निकटवर्तीयांच्या कंपन्यांचा समावेश आहे. काही प्रमुख नेत्यांच्या कुटुंबियांशी संबंधित कंपन्यांनाही परवाने मिळाली आहेत.

राज्यात 41 मध्यम निर्मिती उद्योगांना 328 नवीन परवाने देण्याचा निर्णय झाला आहे. भाजपच्या पाच नेत्यांशी संबंधित असलेल्या कंपन्यांना 40 परवाने मिळणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे निकटवर्तीय लाभार्थी ठरतील तर 96 परवाने हे राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असलेल्यांना देण्यात येणार आहेत. राज्याच्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या कंपन्यांना मिळणार नवीन परवाने

माजी मंत्री बळीराम हिरे यांचा मुलगा प्रसाद हिरे यांच्या डेल्टा डिस्टिलरीज कंपनीला परवाना मिळणार आहे. पंकजा मुंडे यांचे पुत्र आर्यमन पालवे यांची रॅडीको एनव्ही डिस्टिलरीज ला देखील परवाना मिळणार आहे. मंत्री नितीन गडकरी यांचे पुत्र सारंग गडकरी यांची मानस ग्रो इंडस्ट्रीज कंपनीला परवाना मिळणार आहे. आमदार अतुल भोसले आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या पुत्रांच्या कंपनीला परवाना मिळणार आहे. लोकमंगल मऊली इंडस्ट्रीज कंपनीला नवा परवाना मिळणार आहे.

तर माजी आमदार संजय मामा शिंदे संचालक असलेली विठ्ठल कॉर्पोरेशन कंपनीचा समावेश आहे. आमदार राजन पाटील यांचे व्यावसायिक भागीदार असलेली नक्षत्र डिस्टिलरीज आणि ब्रुवरीजला परवाना मिळणार आहे. जय पवार यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या दोन कंपन्यांना नवीन परवाने मिळणार आहेत. जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटील यांच्या राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याला परवाना मिळणार आहे.

Published on: Aug 25, 2025 11:10 AM