महायुतीत मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन
महायुतीतल्या वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव वाढला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
महायुतीतल्या वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव वाढला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मंत्र्यांच्या वर्तनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तीव्र नाराजी असल्याची माहिती आहे. त्याबाबत फडणवीस यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा करून नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. तर माणिकराव कोकाटे यांचं कृषिमंत्रिपद जाणार असल्याची देखील माहिती आहे. आणखीही काही मंत्र्यांना डच्चू मिळणार असण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी गाठीभेटी होणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा वादळी ठरू शकतो, असंही सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे. यात माणिकराव कोकाटे यांच कृषि खातं काढून घेतलं जाणार असून त्यांना मदत आणि पुनर्वसन खातं दिलं जाणार असल्याचं सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
