Supriya Sule | सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुप्रिया सुळेंचे स्पष्ट मत

| Updated on: Mar 30, 2026 | 12:44 PM

युद्धजन्य परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, “सर्वसामान्य माणूस छत्रपती संभाजी नगरमध्ये रिक्षा घेऊन मंत्र्यांच्या दारात पोहोचतो. हॉटेलमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही, मुलांच्या कॉलेज कॅन्टिनमध्येही जेवण व्यवस्थित मिळत नाही. मंत्रिमंडळात मंत्री एकमेकांना सिलिंडरवरून पत्र लिहित आहेत. हे क्रायसिस आहे.”

राज्यात सध्या इराण-इस्त्रायल-अमेरिका युद्धामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. हॉटेल्स बंद पडले आहेत, रिक्षा चालक आंदोलन करत आहेत आणि लोक गॅस सिलिंडर तसेच पेट्रोल-डिझेलसाठी रांगा लावत आहेत. या युद्धजन्य परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, “सर्वसामान्य माणूस छत्रपती संभाजी नगरमध्ये रिक्षा घेऊन मंत्र्यांच्या दारात पोहोचतो. हॉटेलमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही, मुलांच्या कॉलेज कॅन्टिनमध्येही जेवण व्यवस्थित मिळत नाही. मंत्रिमंडळात मंत्री एकमेकांना सिलिंडरवरून पत्र लिहित आहेत. हे क्रायसिस आहे.” सुप्रिया सुळे यांनी पुढे सांगितले, “भारत सरकारने वास्तव स्पष्ट करावे. लोक अडचणीत आहेत आणि जगात युद्ध सुरू आहे. मागील आठवड्यात सर्वपक्षीय बैठक बोलवली होती; त्यावेळी आम्ही सहकार्याची भूमिका घेतली. देश अडचणीत असल्यास सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. सहकार्य करायचे असेल, तर सरकारने पारदर्शकपणे अडचण असल्याचे मान्य करावे.”

Published on: Mar 30, 2026 12:44 PM
Follow Us