Sindhudurg : महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल पाहिलात? बघा नयनरम्य ड्रोन व्ह्यू, पाहताच म्हणाल…
काचेचा पूल उभारण्यात आलेल्या ठिकाणी पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंट्स आणि इतर प्राथमिक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे हे ठिकाण एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ बनले आहे. याच पूलाचं नयनरम्य दृश्य ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टिपण्यात आलंय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्यावर महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे. २२ जुलै २०२५ रोजी पर्यटनमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले असून, हा पूल आता पर्यटकांसाठी खुला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे धबधब्यावर काचेचा पूल उभारण्यात आला असून हा काचेचा पूल पर्यटकांसाठी पर्यटनाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. भाजपचे नेते मंत्री नितेश राणे यांनी देखील या पूलाची पाहणी केली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेहमीच चांगला पाऊस पडतो. त्यामुळे तेथील सौंदर्य चांगलंच बहरताना दिसतंय. अशातच पावसाळ्यात धबधब्याचे रौद्ररूप जवळून अनुभवण्याची संधी या पुलामुळे पर्यटकांना मिळणार आहे. ‘सिंधुरत्न’ योजनेतून हा पूल सुमारे ९९.६३ लाख रुपये खर्चून उभारण्यात आल्याची माहिती मिळतेय. या पूलामुळे पर्यटकांना धबधब्याचे अद्भुत दृश्य जवळून अनुभवण्याची संधी मिळणार आहे. या पुलाचे मनमोहक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यातूनही टिपण्यात आले असून, ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
