संविधानानं दिलेल्या अधिकारात काम करतो, राज्यपालांचा महाविकास आघाडी सरकारला टोला

संविधानानं दिलेल्या अधिकारात काम करतो, राज्यपालांचा महाविकास आघाडी सरकारला टोला

| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 6:20 PM

राज्यपालांच्या मराठवाडा दौऱ्यावरून राजकारण पेटलेलं असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यपालांच्या मराठवाडा दौऱ्यावरून राजकारण पेटलेलं असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला प्रत्युत्तर दिलं आहे. मी संविधानाने दिलेल्या घटनेनुसारच काम करतोय आणि कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं राज्यपालांनी म्हटलं आहे. राज्यपाल सध्या नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान बैठक नाही तर स्थानिक अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली, असं राज्यपाल म्हणालेत. मी कोणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही, मी माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तीन मंडळांचं काम करतोय, असं राज्यपालांनी स्पष्ट केलं. जेवढी मदत करता येईल तेवढी मदत राज्य आणि केंद्र सरकारकडून एकत्रित केली जाणार असंही राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी म्हटलंय.