Cashless Treatment For Accident : अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार, आरोग्य खात्याचा महत्वाचा निर्णय

Cashless Treatment For Accident : अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार, आरोग्य खात्याचा महत्वाचा निर्णय

| Updated on: Apr 18, 2025 | 1:16 PM

₹1 Lakh Cashless Treatment Road Accident : अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखापर्यंत आता कॅशलेस उपचार देण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत घेतला आहे.

अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखापर्यंत आता कॅशलेस उपचार मिळणार आहेत. राज्याच्या आरोग्य खात्याने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारींसाठी स्वतंत्र अॅप देखील तयार करण्यात येणार आहे.

रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालये, सोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांना कठोर दक्षता बाळगावी. यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार व अन्य तातडीच्या रुग्णालयांमधून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश या बैठकीत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.

Published on: Apr 18, 2025 01:16 PM