राज्यात पुन्हा लॉकडाऊन कधी लागणार? आरोग्यमंत्र्यांनी निकष सांगितला?

| Updated on: Aug 15, 2021 | 1:45 PM

राज्यात ज्या दिवशी ऑक्सिजनची गरज 700  मेट्रिक दररोज लागेल, त्या दिवशी लॉकडाऊन लावण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी जालना इथं दिली. कोरोनाच्या लसी वाढवून द्याव्यात अशी मागणीही त्यांनी केलीय.

Follow us on
जालना : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जालना जिल्हाधिकारी कार्यलयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राजेश टोपे यांनी स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर काल 9 लाख 36 हजार नागरिकांचे  लसीकरण करून उच्चांक केला असल्याचे सांगितले. लवकर लसीकर करणे हाच या महामारीवर उपाय असु शकतो, तसेच त्यांनी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. मोठ्या संख्येने लसी उपलब्ध झाल्यास आपण हा लसीकरणाचा 15 लाखा पर्यंत घेऊन जाऊ शकतो.  रोज 10 लाख लसीकरण झाले तर दीड ते दोन महिन्यात राज्याचे लसीकरण पूर्ण होईल. या बाबत त्यांनी केंद्र सरकारला लसी वाढवून द्याव्यात, अशी विनंती केली. तर, राज्यात ज्या दिवशी ऑक्सिजनची गरज 700  मेट्रिक दररोज लागेल, त्या दिवशी लॉकडाऊन लावण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी जालना इंथ दिली.