Maharashtra Rain Updates : राज्यात पावसाचं आगमन होताच हाहाकार! मुसळधार पावसाने अनेक गावांना नुकसान

Maharashtra Rain Updates : राज्यात पावसाचं आगमन होताच हाहाकार! मुसळधार पावसाने अनेक गावांना नुकसान

| Updated on: May 25, 2025 | 11:19 PM

Heavy Rainfall In Maharashtra : राज्यात आज मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनच्या पहिल्याच दिवशी राज्यात सर्वत्र हाहाकार बघायला मिळाला आहे.

मान्सूनचं राज्यात आगमन झालेलं आहे. काही भागात मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच कहर केलेला आहे. त्यामुळे राज्यातल्या अनेक गावांत पुर स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे.

नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात मुसळधार पावसामुळे शिवशाही बसवर स्लॅब कोसळला आहे. या स्लॅबचा ढिगारा हटवण्याचं काम आता सुरू आहे. तर दुसरीकडे बारामतीत देखील आज सकाळपासूनच पावसाला सुरवात झालेली असल्याने या पावसात 3 इमारती खचलेल्या असल्याचं दिसून आलं आहे. या खचलेल्या इमारतीतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. दरम्यान, पुण्याच्या दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीत देखील या पावसामुळे अनेक घरात पाणी शिरलेलं आहे. या गावातील लोकांना देखील तातडीने इतर ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. त्यामुळे पावसाने राज्यात हजेरी लवताच चांगलाच हाहाकार माजवलेला बघायला मिळाला आहे.

Published on: May 25, 2025 11:19 PM