Maharashtra Local Body Elections: सर्व निवडणुका 31 जानेवारीपूर्वीच… अन् ‘स्थानिक’ निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं

| Updated on: Dec 05, 2025 | 1:52 PM

सर्वोच्च न्यायालयाने नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या मतमोजणीचा नागपूर खंडपीठाचा 21 डिसेंबर रोजी निकाल लावण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. सर्व निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घेण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत

महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांची मतमोजणी येत्या 21 डिसेंबर रोजीच होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे, या निवडणुकांचे निकाल एकत्रपणे 21 डिसेंबर रोजी जाहीर केले जातील. सर्वोच्च न्यायालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही पुन्हा एकदा दिले आहेत. काही नगरपंचायती आणि प्रभागांमध्ये 20 डिसेंबर रोजी मतदान होणार होते. जर काही कारणास्तव 20 डिसेंबर रोजी मतदान झाले नाही, तर ज्या ठिकाणी मतदान झाले आहे, त्यांचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात यावा असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. प्रलंबित याचिकांमुळे निवडणूक कार्यक्रमात कोणताही अडथळा येणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. यापुढे उच्च न्यायालयांनी 31 जानेवारीच्या अंतिम मुदतीचे पालन करावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

Published on: Dec 05, 2025 01:52 PM