Maharashtra Local Polls: नेत्यांचं गणगोत सारं.. नेत्यांच्या नातलगांचं सिलेक्शन, कार्यकर्ते इन् फ्रस्ट्रेशन

Maharashtra Local Polls: नेत्यांचं गणगोत सारं.. नेत्यांच्या नातलगांचं सिलेक्शन, कार्यकर्ते इन् फ्रस्ट्रेशन

| Updated on: Nov 19, 2025 | 10:40 AM

महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांमध्ये नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच उमेदवारी मिळत असल्याचे समोर आले आहे. आमदारांच्या पत्नी, भाऊ, मुली आणि नातेवाईकांना मोठ्या पदांवर संधी दिली जात असल्याने, "कार्यकर्त्यांच्या निवडणुका" हे फक्त तोंडदेखले आश्वासन ठरत आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना मात्र सतरंज्या उचलण्याची वेळ येत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच मोठ्या प्रमाणात उमेदवारी मिळत असल्याचे समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीत झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ज्या निवडणुकांकडे पाहिले जाते, त्या निवडणुकांमध्ये नेत्यांच्या गणगोतानेच बाजी मारली आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटासह इतर प्रमुख पक्षांमध्येही हे चित्र दिसत आहे.

यामध्ये भाजपच्या गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन, संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे, आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांना नगराध्यक्षपदाचे तिकीट मिळाले आहे. शिंदे सेनेतून आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील, चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील आणि संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांनाही उमेदवारी मिळाली आहे.

अनेक ठिकाणी आमदारांच्या पत्नी, भाऊ, मुली, सासू-सासरे आणि इतर नातेवाईकांना महत्त्वाच्या पदांवर संधी देण्यात आली आहे. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यांना पुन्हा केवळ प्रचार करण्याची किंवा सतरंज्या उचलण्याची भूमिका पार पाडावी लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Published on: Nov 19, 2025 10:39 AM