Dharashiv : शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अन् कलेक्टरचं नाच-गाणं, ‘त्या’ जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई होणार का? विरोधकांचा हल्लाबोल
धाराशिव जिल्ह्यात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. अशा परिस्थितीत, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा एका सार्वजनिक कार्यक्रमातील नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे विरोधी पक्षांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारे कार्यक्रमात सहभागी होऊन नृत्य करणे योग्य नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
या घटनेनंतर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विरोधकांनी मागणी केली आहे की, राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या संदर्भात विचारले असता, सकाळी लवकर आल्यामुळे आपल्याला या घटनेची माहिती नसल्याचे संबंधित मंत्र्यांनी सांगितले. माहिती घेऊन प्रतिक्रिया देईन असे ते म्हणाले.
