Local Election Fallout : संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त थेट टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न

Local Election Fallout : संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त थेट टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न

| Updated on: Dec 30, 2025 | 4:54 PM

छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तिकीट वाटपावरून भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अनेक जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना किंवा पैशांच्या जोरावर तिकीट दिल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत.

छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तिकीट वाटपावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना तिकीट दिल्याने तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका भाजप कार्यकर्त्याने ४१ वर्षांच्या सेवेनंतरही तिकीट नाकारल्याचा आरोप केला, तर अमरावतीत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनीही अशीच खंत व्यक्त केली. या नाराज कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वावर पैसे घेऊन तिकीट दिल्याचे आरोप केले आहेत. काही कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. तर पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने युती तुटलेली नसून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उदय सामंत हे उमेदवार निवडीबाबत अंतिम निर्णय घेतील, असे स्पष्ट केले आहे. स्थानिक पातळीवरील हा असंतोष महायुतीसाठी आव्हान निर्माण करत आहे.

Published on: Dec 30, 2025 04:54 PM