Gulabrao Patil : …जीव कधीही जाईल! बघा ना माझा संजय राऊत अॅडमिट.. वो मेरा माल है… गुलाबराव पाटलांकडून टिंगल
संजय राऊत गंभीर आजारामुळे रुग्णालयात उपचार घेत असताना, शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या प्रकृतीची जाहीर सभेत टिंगल केली. "फ्रेश राहा, कधी जीव जाईल सांगता येत नाही, बघा ना आता संजय राऊत ॲडमिट आहे," असे पाटील म्हणाले. या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांनी प्रार्थना केल्याचे सांगत सारवासारव केली.
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत सध्या एका गंभीर आजारामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. याच दरम्यान, शिंदे-भाजप सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका जाहीर सभेत राऊतांच्या प्रकृतीवरून वादग्रस्त टिप्पणी केली आहे. “फ्रेश राहा, कधी जीव जाईल सांगता येत नाही, बघा ना आता माझे संजय राऊत ॲडमिट आहे,” असे गुलाबराव पाटील म्हणाले.
गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. या टिप्पणीनंतर काही वेळातच गुलाबराव पाटील यांनी आपल्या वक्तव्याची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीसाठी देवाकडे प्रार्थना करत असल्याचे म्हटले. दुसरीकडे, संजय राऊत यांनी रुग्णालयातून लिहितानाचा फोटो ट्वीट करत मी बोलणे थांबवणार नाही असा संदेश दिला आहे. गुलाबराव पाटील यांनी लोकप्रतिनिधीची ताकद आणि मंत्रीपदाचा अधिकार यावरही भाषणात भाष्य केले.
