Maharashtra Rain : राज्यातील अनेक जिल्ह्यांना IMD चा अलर्ट, अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी, राज्यात कुठं काय परिस्थिती?

Maharashtra Rain : राज्यातील अनेक जिल्ह्यांना IMD चा अलर्ट, अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी, राज्यात कुठं काय परिस्थिती?

| Updated on: Jul 26, 2025 | 5:46 PM

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण आणि पुण्यातील चासकमान धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक आणि नांदेड येथेही पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

जळगावातल्या भुसावळमधील हतनूर धरणाचे सहा दरवाजे आता उघडण्यात आलेत. सध्या हतनूर धरणातनं 8 हजार 405 क्यूसेकनं तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये ही पाण्याची आवक चांगलीच वाढली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी तिकडे चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान खात्याने चंद्रपूरला दोन दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर या पावसामुळे जिल्ह्यातील नदीनाले दुथडी भरून वाहू लागलेत. त्यामुळे पूर परिस्थिती एकूणच निर्माण झाली आहे.

तर पुण्यातील खेड तालुक्यातील चासकमान धरण हे 90% भरले आहे. धरणातील पाणी साठा 90% वर आल्यामुळे खबरदारी म्हणून आता धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातनं सध्या 3 हजार 552 क्यूसेकनं भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातो आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान वसई विरारसह पालघर जिल्ह्यात सुद्धा आज दिवसभर हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पालघर मधील तानसा नदीवर पूर आलेला आहे काही प्रमाणात हा पूर आलेला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी ही जाहीर करण्यात आली आहे.

Published on: Jul 26, 2025 05:46 PM