आरक्षणाच्या मुद्द्यावर जनतेशी संवाद साधा! संजय राऊतांची मागणी

आरक्षणाच्या मुद्द्यावर जनतेशी संवाद साधा! संजय राऊतांची मागणी

| Updated on: Sep 13, 2025 | 11:13 AM

संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत निर्माण झालेल्या गोंधळावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जनतेशी थेट संवाद साधून, प्रलंबित प्रश्नांना रोखठोक उत्तरे देण्याचे आवाहन केले आहे.

संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणतात की, आरक्षणाबाबत जनतेमध्ये मोठा संभ्रम आहे. अनेकांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळत नसल्याने अनेकजण आत्महत्येच्या मार्गावर जात आहेत. लातूर येथे झालेल्या एका आत्महत्येचा उल्लेख करत राऊत यांनी सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना एक पत्रकार परिषद आयोजित करून जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे आवाहन केले आहे. राऊत यांनी या प्रश्नांवर शिवसेना भवनातच एक बैठक आयोजित करण्याची तयारीही दर्शवली आहे. त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजांतील असंतोष दूर करण्यासाठी सरकारने जनतेशी संवाद साधावा असेही आवाहन केले आहे.

Published on: Sep 13, 2025 11:13 AM