Video | विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या 2 नावांना शिवसेना-राष्ट्रवादीचा विरोध ?

Video | विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या 2 नावांना शिवसेना-राष्ट्रवादीचा विरोध ?

| Edited By: | Updated on: Jul 04, 2021 | 5:50 PM

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक शिवसेनेसाठी मोठी परीक्षा ठरणार आहे. कारण काँग्रेसकडून जी नावे समोर येत आहेत, त्यापैकी एका नावाला शिवसेनेचा तर दुसऱ्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे.

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवडणूक शिवसेनेसाठी मोठी परीक्षा ठरणार आहे. कारण काँग्रेसकडून जी नावे समोर येत आहेत, त्यापैकी एका नावाला शिवसेनेचा तर दुसऱ्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे. त्यामुळे भाजपने उमेदवार दिला तर ठाकरे सरकारसाठी हे मोठं आव्हान असणार आहे. जर गुप्त पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पाडली तर भाजप खेळी करण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचं म्हटलं जात आहे.