Maharashtra Rain Red Alert : राज्यासाठी पुढचे 48 तास अतिधोक्याचे! हवामान विभागाकडून काय इशारा?

Maharashtra Rain Red Alert : राज्यासाठी पुढचे 48 तास अतिधोक्याचे! हवामान विभागाकडून काय इशारा?

| Updated on: Sep 28, 2025 | 6:00 PM

पुढील 24 तासांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर किनारपट्टीच्या प्रदेशातही आज रेड अलर्ट आहे. पुणे हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पुढील 48 तास राज्यासाठी महत्त्वाचे आहे.

हवामान खात्याकडून पुढील 24 तासांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  विशेषतः उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. पुणे हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आज उत्तर मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट असताना, उद्या ऑरेंज अलर्ट आणि त्यानंतर यल्लो अलर्ट असणार आहे.

मध्य महाराष्ट्रात आज यल्लो अलर्ट आहे, तर उद्यापासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीच्या प्रदेशातही आज रेड अलर्ट असून, उद्या ऑरेंज आणि त्यानंतर यल्लो अलर्ट राहील. येत्या 24 तासांनंतर पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असली तरी, हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहील.

Published on: Sep 28, 2025 06:00 PM