Rupali Chakankar : हगवणे कौटुंबिक छळ प्रकरणात महिला आयोगाकडून पोलिसांवर ठपका अन् चाकणकरांचं मुख्यमंत्र्याना पत्र, काय केली मागणी?
मयुरी हगवणे प्रकरणामध्ये चार्ज शीट 60 दिवसामध्ये दाखल झाली नाही. चार्ज शीट दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी करा, असं मागणी महिला आयोगाकडून करण्यात येत आहे.
हगवणे कौटुंबिक छळ प्रकरणामध्ये महिला आयोगाकडून पुणे ग्रामीण पोलिसांवरच ठपका ठेवण्यात आला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात एक मगणी करण्यात आली आहे. मयुरी हगवणेला होणाऱ्या त्रासाबद्दल महिला आयोगात तक्रार दाखल करण्यात आली होती. आयोगानं तक्रार दाखल करून घेत पौड पोलिसांना कार्यवाहीचे आदेशही दिले होते. आयोगाच्या सूचनेनुसार पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांकडून झालेल्या दिरंगाईचा अहवालही महिला आयोगानं मागवला होता. या प्रकरणात 60 दिवसात चार्जशीट दाखल करण अपेक्षित होतं. मात्र विहित मुदतीमध्ये चार्जशीट दाखल झाली नाही. गुन्ह्याची चार्जशीट विहित मुदतीत कोर्टात सादर करण्यात आली नसल्याची ही बाब गंभीर आहे. चार्जशीट दाखल करण्यास झालेल्या विलंबाची गृह विभागाने आता चौकशी करावी, अशी मागणी या पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे महिला आयोगाने केली आहे.
