कांदा प्रश्न की जागावाटप? दिल्ली दौऱ्यामागचं गुपित काय?; फडणवीस-शिंदे-पवारांचा मुक्काम वाढला

कांदा प्रश्न की जागावाटप? दिल्ली दौऱ्यामागचं गुपित काय?; फडणवीस-शिंदे-पवारांचा मुक्काम वाढला

| Updated on: May 28, 2026 | 1:45 PM

राज्यातील महायुती सरकारमधील प्रमुख नेते सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत, त्यांच्या वाढलेल्या मुक्कामामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत राज्यातील कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. या बैठकीला केंद्रीय कृषिमंत्री तसेच ग्राहक व सार्वजनिक वितरण विभागाचे मंत्रीही उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील कांदा उत्पादक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत केंद्र सरकारसमोर विविध मागण्या मांडण्यात आल्या. या मुद्द्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र बैठक संपल्यानंतरही महायुतीचे प्रमुख नेते दिल्लीमध्येच ठाण मांडून असल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीतील 17 जागांच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून चर्चेच्या अनेक फेऱ्या सुरू असून अंतिम फॉर्म्युल्यावर अद्याप एकमत झालेलं नाही. त्यामुळेच दिल्लीतील मुक्काम वाढल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता दिल्लीतील बैठकीनंतर महायुतीचा अंतिम जागावाटपाचा फॉर्म्युला काय ठरणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Published on: May 28, 2026 1:45 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us