Nanded THAR Video : ‘थार’चा थरार….पाणी भरलंय तरीही डेरिंग अन् आलं अंगलट, बघा काय घडलं?

Nanded THAR Video : ‘थार’चा थरार….पाणी भरलंय तरीही डेरिंग अन् आलं अंगलट, बघा काय घडलं?

| Updated on: Aug 16, 2025 | 6:17 PM

नांदेड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे एका तरुणाला पावसाच्या साचलेल्या पाण्यातून थार गाडी (Thar) घेऊन जाण्याचा प्रयत्न चांगलाच महागात पडला. हा प्रयत्न त्याच्या अंगलट आल्याचं समोर आलं आहे.

राज्यभरात सध्या पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे. अशातच नांदेडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पावसाच्या पाण्यातून एका महाशयाने थार कार घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र ही डेरिंग त्या व्यक्तीच्या चांगलीच अंगलट आल्याचे पाहायला मिळाले. सध्या याच घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. नांदेड शहरात जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. अशाच एका साचलेल्या पाण्यातून एका तरुणाने आपली थार गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला गाडी पाण्यातून पुढे गेली, मात्र काही अंतरावर गेल्यावर ती अचानक बंद पडली आणि पाण्यात अडकली.

गाडीत अडकलेल्या तरुणांना गाडीतून बाहेर पडता येत नव्हते, कारण गाडीचा दरवाजा उघडला तर पाणी आत येण्याची शक्यता होती आणि त्यामुळे गाडीतील लोकं आतंच अडकून पडले. यावेळी तरुणांनी मदतीसाठी आरडाओरड केली. तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी गाडीचा दरवाजा उघडून तरुणांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Published on: Aug 16, 2025 06:17 PM