Malegaon Bomb Blast 2008 : ती वडापाव आणायला गेली अन्… बॉम्बस्फोटात मुलगी गमावली वडील हळहळले; आजचा निकाल चुकीचा…
मालेगाव बॉम्बस्फोटात मुलगी गमावली,आजचा निकाल चुकीचा, सर्व गुन्हेगार असल्याची प्रतिक्रिया शेख लियाकत यांनी दिली. ज्यांनी आपली मुलगी या स्फोटात गमावली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. मात्र मालेगावमध्ये २००८ साली हा बॉम्बस्फोट झाला त्यावेळी ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला या निकालाने मोठा धक्का बसला आहे. मालेगाव बॉम्बस्फोटात ज्यांची मुलगी मृत्यूमुखी पडली होती. त्या मुलीचे वडील शेख लियाकत यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना आपल्या भावना बोलून दाखवल्या. मुंबईतील राष्ट्रीय अन्वेषण संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात या प्रकरणी आज निकाल जाहीर करण्यात आला. यावर बोलताना शेख लियाकत यांनी निकालावर नाराजी व्यक्त करत आजचा निकाल चुकीचा असल्याचे म्हणत सर्व निर्दोष असलेले गुन्हेगार असल्याच म्हटलंय. ‘माझी मुलगी वडापाव घेण्यासाठी घराबाहेर पडली होती. तेव्हा बॉम्बस्फोट झाला. आवाज आल्यानंतर मी बाहेर पडलो. मृत्यूमुखी पडलेल्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे गेल्यानंतर कळालं त्यात माझी मुलगी होती आणि दोन दिवसांनंतर माझ्या मुलीचा मृतदेह आम्हाला मिळाला’, असं शेख लियाकत यांनी म्हटलं.
