बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर

बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर

| Updated on: Aug 09, 2026 | 5:52 PM

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यासोबत हलिशहर येथे धक्कादायक घटना घडली. त्यांच्या गाडीवर संतप्त नागरिकांनी चिखल, चप्पल, बूट आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्याची माहिती समोर आली आहे.

ममता बॅनर्जी 9 ऑगस्ट रोजी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हलिशहर येथे गेल्या होत्या. तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी ममता बॅनर्जी तेथे पोहोचल्या होत्या. यावेळी काही नागरिकांनी त्यांच्या ताफ्याला अडवले.

संतप्त नागरिकांनी ममता बॅनर्जी यांच्या गाडीला चारही बाजूंनी घेरले. त्यानंतर गाडीच्या दिशेने चिखलफेक करण्यात आली. तसेच चप्पल, बूट आणि पाण्याच्या बाटल्याही फेकण्यात आल्या. यावेळी जमावाकडून ममता बॅनर्जी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गर्दीला नियंत्रित करत ममता बॅनर्जी यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Published on: Aug 09, 2026 5:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us