Manoj Jarange Patil : सरकार चाबरं XXX… आमच्याकडून शास्त्रशुद्ध पूजा हवी, तुम्ही घंटी वाजवली की झालं! जरांगे भडकले

Manoj Jarange Patil : सरकार चाबरं XXX… आमच्याकडून शास्त्रशुद्ध पूजा हवी, तुम्ही घंटी वाजवली की झालं! जरांगे भडकले

| Updated on: Aug 30, 2025 | 5:25 PM

मुंबईतील आझाद मैदानावर आज माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि जरांगे पाटलांमध्ये सातारा आणि हैद्राबादच्या संस्थानात सापडलेल्या कुणबी नोंदींबाबत चर्चा झाली.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला असून गेल्या दोन दिवसांपासून आझाद मैदानावर त्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. या समितीने गेल्या 13 महिन्यांमध्ये सुमारे 57 लाख कुणबी नोंदी तपासल्या आहेत. याच समितीने म्हणजेच निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीत समितीने आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली. तर सगेसोयरेसाठी जे कायदेशीर प्रक्रिया करायची आहे. त्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंती निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी जरांगेंना केली. मात्र यावर यासाठी एक दिवसही देणार नाही. मराठवाड्यातील मराठे कुणबी आहेत. संपला विषय. अहवाल देऊन टाका, असं थेट जरांगेंनी म्हटलं.

तर सरकार चाबरं XXXचं आहे. 13 महिने अभ्यास केला. अहवाल देऊन टाका. मराठवाड्यातील मराठा कुणबी आहे. तुम्ही अहवाल द्या. तुम्ही एका मिनिटात अहवाल द्या. राज्यपाल विधानभवन अस्तित्वात नाही का. पाच मिनिटात होतं. मी एक मिनिटं देणार नाही. 13 महिने अभ्यास झाला. सहा महिने कशाला पाहिजे. आम्ही बॉम्बे गव्हर्नेमेंटला वेळ द्यायला तयार आहे. हैद्राबाद गॅझेट आणि सातारा संस्थानच्या गॅझेटला वेळ द्यायला तयार नाही. आमच्याकडून शास्त्रशुद्ध पूजा हवी, तुम्ही घंटी वाजवली की झालं, असं म्हणत जरांगेंनी सरकारवर निशाणा साधला.

Published on: Aug 30, 2025 05:13 PM