Manoj Jarange Mumbai Morcha : मुंबई जाम केली आता 2 तासांत… हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या मराठ्यांना जरांगेंचं आवाहन काय?
सरकारला आपल्याला सहकार्य करायचे नव्हते म्हणून मराठ्यांना मुंबईत यावं लागलं असं म्हणतं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. तर सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा निर्धारही पुन्हा व्यक्त केला.
मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. काही वेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांचा मराठा मोर्चा हा मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत आंदोलन स्थळी दाखल होताच त्यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकार आपल्याला सरकार्य करत नव्हतं म्हणून आपण मुंबईत आलो, असल्याचे म्हटले. दरम्यान, मोर्चासाठी मराठा समाज मोठ्या संख्येने आझाद मैदानावर दाखल झाला असून मुंबईत मराठे धडकल्यानंतर अनेक भागात मोठी वाहतूककोंडी बघायला मिळाली इतकंच नाहीतर काही काळ मुंबईत वाहतूकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना पोलीस सांगतील त्या ठिकाणी आपली वाहनं पार्क कऱण्याच्या सूचना दिल्यात तर यासोबतच मुंबई जाम केली आता दोन तासांत मुंबई मोकळी झाली पाहिजे, असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटलांनी आंदोलकांना केलं.
