Manoj Jarange Patil Andolan | तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे पाटलांचा भरत गोगावले यांना थेट इशारा

Manoj Jarange Patil Andolan | तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे पाटलांचा भरत गोगावले यांना थेट इशारा

| Updated on: Sep 09, 2026 | 10:54 AM

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार, विशेषतः एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. आरक्षण देऊनही अंमलबजावणी न केल्याने समाजात संताप असल्याचे ते म्हणाले. त्यांनी अनेक राजकीय नेत्यांवर मराठा समाजाच्या भावना दुखावल्याचा आणि आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करत असल्याचा आरोप केला. मराठा समाज अत्यंत हुशार असून कोणाचेही वाटोळे सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आरक्षणाची अंमलबजावणी करण्याऐवजी सरकारने मराठा समाजाची पिळवणूक केल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्यांच्या मते, सरकारने दिलेल्या आश्वासनांना कधीच न्याय मिळाला नाही, ज्यामुळे समाजात तीव्र संताप आहे.

जरांगे पाटील यांनी काही मंत्र्यांची नावे घेत त्यांना मराठा समाजाला हिणवू नये असा सल्ला दिला. मराठ्यांनी सत्ताधाऱ्यांना प्रचंड आदर दिला आहे, मात्र आता त्यांची फसवणूक केली जात आहे. फडणवीस आणि शिंदे यांनी मराठा समाजाचे आयुष्य उद्ध्वस्त केले असून, समाजाला समजून घेण्यासाठी आता १२ तारखेपर्यंतची वाट पाहा, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारने जाणीवपूर्वक दिरंगाई करत मराठा समाजाला गुदगुल्या केल्याचेही त्यांनी म्हटले. भाजपने अनेक जुन्या नेत्यांचे राजकीय वाटोळे केले असल्याचा आरोप करत, जरांगे पाटील यांनी मराठा समाज शांत बसणार नाही, असे ठणकावून सांगितले.

Published on: Sep 09, 2026 10:54 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us