Maratha Reservation Rally : जरांगेंची माघार नाहीच… अखेर मुंबईतील आझाद मैदानावर मराठ्यांसह धडकले

Maratha Reservation Rally : जरांगेंची माघार नाहीच… अखेर मुंबईतील आझाद मैदानावर मराठ्यांसह धडकले

| Updated on: Aug 29, 2025 | 9:16 AM

ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे आजपासून मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. पुणे जिल्ह्यातून मराठा समाजाचा हा मोठा ताफा जरांगेंसोबत मुंबईत दाखल झालाय. आज पहाटेच जरांगे मुंबईत धडकले आहेत. त्याआधी शेवटचा इशारा जरांगेंनी दिला होता. गोळ्या घातल्या तरी माघार नाही असा थेट इशारा जरांगेंनी दिलाय.

मुंबईत येण्याच्या काही तास आधी जरांगेंनी पुन्हा थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिशेने मोर्चा वळवल्याचे पाहायला मिळाले. गोळ्या घातल्या तरी घाबरत नाही. आझाद मैदानात आंदोलन करू देतात की नाही बघतोच असा इशारा जरांगेंनी दिला होता. जरांगे पाटील सह मराठा समाजाचा ताफा रात्री मुंबईत दाखल झालाय. पण आझाद मैदानात फक्त एकच दिवस आंदोलनाची परवानगी आहे आणि त्यातही पाच हजारच आंदोलकांची अट घालण्यात आली आहे. मात्र जरांगेंसोबत मराठ्यांचा भगवा जनसागर आहे तर ओबीसी किंवा मराठा कुणावरही अन्याय होऊ देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय.

अंतरवाली सराठीहून निघाल्यानंतर ताफा पुण्यात येईपर्यंत मराठा समाजाचे गट मोठ्या प्रमाणात जरांगेंसोबत जुळताहेत पण ज्या मागणीसाठी जरांगे मुंबईत येत आहेत त्यावरून सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे की ओबीसींना धक्का लावणार नाही आणि जरांगेंची मुख्य मागणी आहे मराठा आणि कुणबी एकच आहेत त्यामुळे सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्या अर्थात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी जरांगेंची आहे आणि आता पुन्हा मनोज जरांगेंनी शिवनेरीमधून मुख्यमंत्री फडणवीसांना राजकीय बरबादीची धमकी दिली आहे. मराठ्यांच्या नाराजीची लाट उसळली तर फडणवीसांच राजकीय करिअर बरबाद होईल असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय. बघा व्हिडीओ

Published on: Aug 29, 2025 09:09 AM