मनोज जरांगे पाटील म्हणतात तसं होणार नाही, त्यासाठी विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं काय?

| Updated on: Sep 09, 2023 | 9:44 PM

मराठ्यांना ओबीसी वर्गात कसं टाकता येईल, असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला. त्यावेळी मराठ्यांच्या वंशावळी काय होत्या हे पाहावं लागेल. कुणीही मागणी केली आणि तसं होईल, असं काही नाही. महाराष्ट्राला शांतता आणि स्थिरता हवी आहे, असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

Follow us on

मुंबई, ९ सप्टेंबर २०२३ : मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अडून बसलेत. तसं केलं तर ओबीसींच्या आरक्षणावर त्याचा परिणाम होईल. म्हणून ओबीसी नेत्यांचा त्याला विरोध आहे. त्याचवेळी विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी ए, ओबीसी बी एसा फार्म्युला सांगितला. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी राज्य सरकारला तिसऱ्यांदा अपयश आलं. मराठ्यांना सरसकट कुणबीचं जात प्रमाणपत्र द्या, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. मात्र, जरांगे पाटील यांच्या मतानुसार होणार नाही, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी विरोध दर्शवला. जरांगे पाटील यांनी म्हणावं आणि सर्व व्हावं, असं नाही. कायद्यानुसार चौकटीत बसून होत असेल तर कुणाचीच हरकत नाही. जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या म्हटलं तर हे ओबीसी समाज मान्य करेल का. जरांगे पाटील म्हणतील, असंच होणार नाही. ओबीसी कोट्याला धक्का न लावता आरक्षण द्या, असं राष्ट्रीय ओबीसी महासंघ, काँग्रेस, भाजप, शरद पवार गट आणि ठाकरे गटाचं म्हणणं आहे. ओबीसींमध्ये गरीब समाजाचे आरक्षण आहे. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण दिल्यास गरिबांना आरक्षण मिळणार नाही. राज्यात ओबीसींना १९ टक्के आरक्षण आहे. त्यात ३५० हून अधिक जाती आहेत.