Manoj Jarange Patil : त्याचा कार्यक्रम वाजवायचाच…परळीतील टोळी अन् येवल्यातील अलिबाबा जातीयवादी, जरांगेंचा हल्लाबोल
मनोज जरांगे पाटील यांनी वडट्टीवार यांच्या विधानांवर सडकून टीका केली, समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. त्यांनी परळी आणि येवल्यातील नेत्यांवर फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्यांना राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याची चेतावणी दिली.
मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेस नेते वडट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यासोबतच समाजात दुही निर्माण करणारी विधाने टाळावीत, असा सल्ला त्यांनी दिला. मराठा आरक्षणाविरोधात बोलल्यास राजकीय भवितव्य संपुष्टात येईल, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला. त्यांनी परळी आणि येवल्यातील काही नेत्यांवर जातीवादाचा आरोप करत, मराठा समाजाला लक्ष्य करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला.
जरांगे पाटलांनी कुणबी नोंदींना विरोध करणाऱ्यांना बोगस ठरवत, मराठा समाजाचे १६ टक्के आरक्षण परत मिळावे आणि १९९४ चा ओबीसी आरक्षणाचा जीआर रद्द करावा, अशी मागणी केली. मराठ्यांनी आता कठोर भूमिका घेऊन आपल्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Published on: Oct 05, 2025 05:47 PM
